Ajit Pawar । अजित पवारांची डोकेदुखी वाढली! बैठकीला कमी आमदारांची हजेरी, काय चाललंय पडद्यामागं? जाणून घ्या

Ajit Pawar

Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत (NCP) बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबत 9 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. वर्षभरापूर्वी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारवर टीका करणारे अजितदादा आज त्यांच्याच सोबत सत्तेत सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भूकंप आला आहे. परंतु त्यांचा हा निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

MS Dhoni । लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार धोनीच्या आयुष्यावरील दुसरा चित्रपट, कोण साकारतंय धोनीची भूमिका?

आपल्याकडेच बहुमत जास्त आहे असा दावा अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही गटांनी आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती. परंतु वांद्रे येथील एमईटी कॉलेजच्या मैदानावर आयोजित मेळाव्यात 29 आमदारांनी हजेरी लावली. आपल्याकडे 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करणाऱ्या अजित पवार यांचे टेन्शन वाढले आहे.

Ajit Pawar । शिंदे गटाचं वाढलं टेन्शन, अजित पवारांना मिळणार ‘या’ खात्याची जबाबदारी

अजित पवार यांच्याकडे 54 आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदार असतील तरच त्यांचे बंड यशस्वी होईल. अन्यथा त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. एमआयटीत पार पडलेल्या गुप्त बैठकीवेळी कमी आमदारांची संख्या पाहता अजित पवार यांचा चेहरा पडला होता. तसेच शरद पवार यांच्या बैठकीला अजून काही काळ बाकी आहे परंतु त्यांच्याकडे फक्त 10 आमदार असल्याने त्यांचेही टेन्शन वाढले आहे.

Urfi Javed I उर्फीचा अवतार पाहून लागेल 440 व्होल्टचा झटका, घायाळ करणारा अंदाज पाहून बाईकही कोसळली.. पहा व्हिडिओ

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *