“साहेब तुम्ही मैदानात उतरा, तुम्हाला करोडो हातांची मदत होईल;” रोहित पवारांची शरद पवार यांना भावनिक साद

Rohit Pawar

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) चांगलाच धक्का बसला आहे. अजित पवार यांनी आपल्याकडेच जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी पक्षाचे चिन्ह आणि पक्षावर दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आज आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । अजित पवारांची डोकेदुखी वाढली! बैठकीला कमी आमदारांची हजेरी, काय चाललंय पडद्यामागं? जाणून घ्या

अजित पवारांना त्यांच्या निर्णयावरून टीकेला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. “आज या दारात… उद्या त्या दारात… पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल मग लोकांना काय सांगणार?” अशी खोचक टीका रोहित पवार यांनी एका कवितेच्या माध्यमातून केली आहे. “पवारसाहेब तुम्ही मैदानात उतरा, करोडो हात तुम्हाला साथ देतील” अशी भावनिक साद रोहित पवार यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) घातली आहे.

MS Dhoni । लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार धोनीच्या आयुष्यावरील दुसरा चित्रपट, कोण साकारतंय धोनीची भूमिका?

“आज या दारात… उद्या त्या दारात… पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल मग लोकांना काय सांगणार? तोंड कसं दाखवणार? काल तर कडवा विरोध होता.. मग आज अचानक गळ्यात गळा कसा? तो कोणता गळ आहे… ज्या गळाला लागला मासा! तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं? रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं? अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार? किती दिवस आम्ही हेच ऐकायचं? जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा.. आता कुणाकडून करायची जनतेने आशा? भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा.. कोणता पक्ष… कोणता विचार.. अन् कसली निष्ठा.. इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा.. कालची भाषा एक होती… आज भलतंच बरळत आहेत…

Ajit Pawar । शिंदे गटाचं वाढलं टेन्शन, अजित पवारांना मिळणार ‘या’ खात्याची जबाबदारी

स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत. कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र… अन् कुठेय परंपरा? निर्लज्जपणाचा झाला कळस… तुम्हाला येत नाही याची किळस? मत ज्यांची घ्यायची… त्यांचीच चेष्टा करायची ही कोणती रित? ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली.. ती देशाला विचार देणारी पिढी आज कुठे हरवली? शिव-शाहू-फुले-आंबेडकर… तुम्ही महाराष्ट्र घडवला… तुमच्या पुरोगामी विचारांच रोपटं इथं रुजवलं.. पण आज याच रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन? हे होत असेल तर रोखायचं कुणी? विष पसरवणाऱ्याला थोपवायचं कुणी? त्यासाठी साहेब…. लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती आता तुम्हीच उठा… अन मैदानात उतरा… शेकडो… हजारो… लाखो… करोडो हात देतील तुम्हाला साथ.. त्यात माझेही असतील दोन हात..” अशी कविता रोहित पवार यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांच्या या टीकेला अजित पवार काय उत्तर देतील, याकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

Urfi Javed I उर्फीचा अवतार पाहून लागेल 440 व्होल्टचा झटका, घायाळ करणारा अंदाज पाहून बाईकही कोसळली.. पहा व्हिडिओ

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *