Ajit Pawar । ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असताना अजित पवार शांत का? ओबीसी जनमोर्चाच्या अध्यक्षांचा सवाल

Ajit Pawar

Ajit Pawar । सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला मराठा समाजाचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील उपोषणे केली जात आहेत. काही ठिकाणी तर सरकारचा निषेध देखील व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे.

Bank Deposit । काय सांगता! रातोरात ४० जण झाले लखपती, अचानक खात्यात आले २ लाख रुपये

मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना प्रकाश शिंदे म्हणाले ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असं अजित पवार यांनी यापूर्वी म्हटलं होतं. मग आता अजित पवार शांत का? असा सवाल उपस्थित केला आहे.

Manoj Jarange । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना करा अटक, कुणी केली मागणी? जाणून घ्या

त्याचबरोबर प्रकाश शेंडगे पुढे बोलताना म्हणाले, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी सरकारने जीआर काढण्याचा देखील माहिती मिळाली आहे. मात्र आमच्याकडे हा जीआर अजूनही पोहोचलेला नाही असे ते म्हणाले आहेत.

Ajit Pawar । राज्याचे मुख्यमंत्री होणार का? खुद्द अजितदादांनी दिले स्पष्टीकरण

Spread the love