Prashant Bhoir । सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहेत. मात्र आता ठाण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहापूरचे राष्ट्रवादीचे आमादर दौलत दरोडा यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत भोईर यांचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये प्रशांत भोईर यांचा मृत्यू झाला आहे.
Ahmednagar Accident । अहमदनगमध्ये बस आणि इर्टिगा गाडीचा भीषण अपघात; ४ ज्यांचा जागीच मृत्यू
रस्ता क्रॉस करत असताना भिवंडी जवळ एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यांनतर प्रशांत भोईर गंभीर झाले आणि त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूनं सगळीकडे मोठी हळहळ व्यक्त होत आहे. माहितीनुसार, प्रशांत भोईर हे 2019 पासून आमदार दौलत दरोडा यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहात होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने शहापूरमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.