Ajit Pawar । प्रसिद्ध अभिनेत्रीने केली थेट अजित पवारांवर टीका; म्हणाली, “बेईमानी ओळखते…”

Ajit Pawar

Ajit Pawar । राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसापासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर केला. या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाचा पराभव झाला असून अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे. (Latest marathi news) यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. फक्त राजकीय नेतेच नव्हे तर सेलिब्रेटींनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mahendra More । बिग ब्रेकिंग! भाजपच्या माजी नगरसेवकार गोळीबार

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. तेजस्विनीने (Tejaswini Pandit ) एक्सवर एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सध्या तेजस्विनीच्या पोस्टची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. “जनता मूर्ख नाही.सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे!” अशी पोस्ट तेजस्वीने केली आहे. सध्या ही पोस्ट खूप चर्चेत आहे.

Sharad Pawar । नरेंद्र मोदींनी नेहरुंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचं उत्तर, म्हणाले…

तेजस्विनीने केलेल्या पोस्टमध्ये कुणाचेच नाव घेतले नाही. मात्र, तिने ही पोस्ट सध्याच्या राजकीय परिस्थितीवरच केल्याचे बोलले जात आहे. तिने अप्रत्यक्षपणे राजकीय स्थितीवर भाष्य केल्याचे म्हटले जातेय. त्यामुळे सध्या तिची पोस्ट चर्चेत आहे. तेजस्वीच्या पोस्टवर अनेक वेगेवेगळ्या कमेंट देखील येत आहेत.

UP Politics । इंडिया आघाडीला मोठा धक्का! रालोद भाजपसोबतच जाण्याच्या तयारीत

Spread the love