Sharad Pawar । नरेंद्र मोदींनी नेहरुंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचं उत्तर, म्हणाले…

Sharad Pawar

Sharad Pawar । देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. ‘मोदींचं भाषण ऐकून मला दुःख झालं. नेहरुंचं योगदान नाकारता येणार नाही,’ असे शरद पवार म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निकालांनंतर पहिल्यांदा ते माध्यमांसमोर आले आहेत. यावेळी त्यांनी मोदींवर निशाणा साधला. (Sharad Pawar on Nehru)

UP Politics । इंडिया आघाडीला मोठा धक्का! रालोद भाजपसोबतच जाण्याच्या तयारीत

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या विद्यार्थी आघाडीच्यावतीनं शिक्षण आणि बेरोजगारी याबाबत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. यावेळी शरद पवारांनी जवाहरलाल नेहरुंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “संसदेच सत्र सुरू आहे तिथं पंतप्रधान बोलत असल्याने मला यायला उशीर झाला. पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यावर मला दुःख झालं. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान असतात, ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात. आपण पंडित नेहरू यांनी केलेल्या कामांकडं डोळेझाक करू शकत नाही. त्यांनी देशासाठी काम केलं,” असे स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले आहे. (Latest marathi news)

Maharashtra Politics । मोठी बातमी! निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने दिला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव

पुढे ते म्हणाले की, “नेहरूंनी देशात सुरू झालेल्या लोकशाहीला ताकद देण्याचं काम केलं. त्यांनी देशाचा चेहरा बदलण्याचं काम केलं. त्यात योगदान देणाऱ्या व्यक्तीबद्दल पंतप्रधान सभागृहात बोलले ते योग्य नाही. नेहरू, इंदिरा गांधी यांनी देशासाठी काही ना काही चांगल काम केलं आहे,” असे शरद पवार म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis । राष्ट्रवादीच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांनी दिली 4 शब्दांत प्रतिक्रिया! म्हणाले, ‘हा निर्णय..’

Spread the love