Ahmednagar News l ब्रेकिंग! अहमदनगरमधून सर्वात मोठी बातमी समोर; निलेश लंके आघाडीवर

Nilesh Lanke Sujay Vikhe Patil

Ahmednagar News l अहमदनगर लोकसभा जागेसाठी (Ahmednagar Lok Sabha) चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान झाले. यावेळी एकूण 62.76 टक्के मतदान झाले. येथे मुख्य लढत भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे निलेश ज्ञानदेव लंके (Nilesh Lanke) यांच्यात होणार असल्याचे मानले जात आहे. 2019 मध्ये या लोकसभा जागेवर एकूण 64.79 टक्के मतदान झाले होते.

Shirur Election Results । शिरूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! अमोल कोल्हेंनी आढळरावांना टाकलं मागे

अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सध्या सुरु आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्यात लढत झाली आहे. यामध्येच आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

Supriya Sule । ब्रेकिंग! बारामतीतून पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे आघाडीवर; अजित पवारांना धक्का

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत भाजपचे सुजय विखे पाटील यांनी 7 लाख 4 हजार 660 मते मिळवून विजय मिळवला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम अरुण जगताप यांचा २ लाख ८१ हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत संग्राम अरुण यांना एकूण 4 लाख 23 हजार मते मिळाली. लोकसभेची ही जागा दीर्घकाळ काँग्रेसच्या ताब्यात होती. 1952 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून 1996 पर्यंत काँग्रेस पक्ष सलग 12 वेळा येथून विजयी होत राहिला. मात्र, नंतरच्या काळात काँग्रेसची पकड कमकुवत झाली आणि आता या जागेवर भाजपची सत्ता आहे.

BJP l सर्वात मोठी बातमी! भाजपने उधळला विजयाचा गुलाल; ‘या’ उमेदवाराने फडकावला विजयाचा पताका

Spread the love