Cabinet meeting । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! सरकारने अहमदनगर शहराचं नाव बदललं, हे असणार नवीन नाव

Cabinet meeting

Cabinet meeting । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकी जवळपास 26 निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीमध्ये अहमदनगर शहराचं नाव बदलण्यात आले आहे. (Ahmednagar City Name) दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून शहराचं नामांतर करावं अशी मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. (Latest marathi news)

Cabinet meeting । ब्रेकिंग! पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचं नाव आता ‘राजगड’, मंत्रिमंडळ बैठकीतील सर्वात मोठा निर्णय

Ads

अहमदनगर शहराचं नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर (Punyashlok Ahilya Devi Nagar) करण्यात आले आहे. त्याशिवाय पुणे जिल्ह्यातील वेल्हे (Velhe) तालुक्याला आता राजगड (Rajgad) म्हणून नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे ऐतिहासिक किल्ले आहेत. या तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.

Vijay Shivtare । मोठी बातमी! बारामतीत विजय शिवतारे देणार अजितदादांना आव्हान

इतकेच नाही तर आज पार पडलेल्या बैठकीत मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी राज्य सरकारने औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं केलं आहे. त्यानंतर आता अहमदनगर शहरासह वेल्हे तालुक्याचं आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलली आहे.

Maharashtra Politics । अजित पवारांना मोठा धक्का! ‘हा’ आमदार सीबीआयच्या कचाट्यात, शिंदे गटानेच केली तक्रार

Spread the love