Rajan Salvi । राज्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Thackeray group । ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; बड्या अधिकाऱ्याला अटक
माहितीनुसार, रत्नागिरी एसीबी कार्यालयातून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा 118 टक्के संपत्ती जास्त असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार साळवी यांच्यावर करण्यात आला आहे. पोलीस एफआयआर मध्ये आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी त्याचबरोबर त्यांची पत्नी आणि मुलाचा समावेश असल्याची देखील माहिती मिळत आहे.
मागच्या दीड वर्षापासून राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. याच मालमत्तेची चौकशी करण्याकरता आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार राजन साळवी यांच्या घरावर पुन्हा एकदा छापा मारला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
Sushil Kumar Shinde । ब्रेकिंग! काँग्रेसला पुन्हा मोठा झटका बसणार? दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर