Accident News । भीषण अपघात, कार-ट्रेलरच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू

Accident News

Accident News । राज्यात दररोज कुठे ना कुठे अपघात (Accident) होत असतात. या अपघातात अनेकांचा बळी जातो. अपघातांमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होतात. सध्या अशीच एक घटना घडली आहे. हायवेवर कार-ट्रेलरची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest marathi news)

Ajit Pawar । “आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा, नाहीतर…” अजित पवारांचे खळबळजनक वक्तव्य

अहमदाबाद वडोदरा द्रुतगती मार्गावर नडियादजवळ भीषण अपघात झाला असून यात तब्बल 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ट्रेलरला धडक दिल्याने हा भीषण (Car Accident) अपघात झाला आहे. ही कार वडोदराहून अहमदाबादच्या दिशेने जात होती.

Salman Khan । सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी धक्कादायक खुलासा

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. तसेच एक्सप्रेस हायवे पेट्रोलिंग टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी आली होती. या भीषण अपघातामुळे एक्स्प्रेस हायवेवर खूप ट्रफिक जाम झालं होत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Abhijit Bichukale । अभिजित बिचुकलेंनी फुंकले रणशिंग, दोन रुपयांची दारू-मटण पाजून…

Spread the love