Accident News । “कारला ओव्हरटेक करायला गेला अन्..”, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा अपघाताचा VIDEO

Accident News

Accident News । सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडिओ आपल्याला हसण्यास भाग पाडतात तर काही व्हिडिओ आपल्याला एकदम थक्क करून सोडतात. सध्या देखील सोशल मीडियावर असाच एक थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बाईक स्वार कारला ओव्हरटेक करत असतो आणि थेट रस्त्याच्या सुरक्षा भिंतीवर जाऊन आपटत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Baramti News । मोठी बातमी! बारामतीत भाजपचाच खासदार असणार…बैठकीत नेमकं काय ठरलं?

मात्र या बाईकवर व्यक्तीच्या डोक्यामध्ये हेल्मेट असल्यामुळे त्याला इजा होत नाही. त्यामुळे हेल्मेट सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे याची जाणीव या ठिकाणी होत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल बाईक स्वाराने जर हेल्मेट घातलं नसतं तर काय झालं असतं? (Viral Video )

Bjp । भाजपला मोठा धक्का! नांदेडमध्ये बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Shailendra Singh या ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिण्यात आले आहे की, हेल्मेट मुळे वाचला जीव. सध्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.

World Cup 2023 । “शतक हुकल्यानंतर विराट कोहलीने ड्रेसिंग रुममध्ये केलं असं काही कृत्य की…”व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Spread the love