World Cup 2023 । वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात झाली आहे. यंदाचा विजेता कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 2011 साली टीम इंडियाने वर्ल्डकप सामना जिंकला होता, त्यानंतर संघाला ट्रॉफी जिंकता आली नाही. यंदा तरी संघाला ट्रॉफी मिळवता येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, काल टीम इंडियाने (Team India) वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं 200 धावांचं आव्हान हे 4 विकेट्सने विजय मिळवला. (World Cup 2023)
Supriya Sule । “देवेंद्र फडणवीसांबद्दल मला खूप वाईट वाटतं”, नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सध्या शुभमन गिल (Shubman Gill) त्याच्या तब्येतीमुळे खेळात नसून त्याच्या जागी ईशान किशन खेळत आहे मात्र याने निराशा केली. वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना खेळणारा ईशान अपयशी ठरला. ईशान किशन झिरोवर आऊट झाला. (Ishan Kishan out for a zero) त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली हे दोघे मैदानात उतरले. ईशान, रोहित आणि श्रेयस झिरोवर आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 3 बाद 2 धावा अशी झाली. त्यामुळे केएल आणि विराट या दोघांसमोर मोठं आव्हान होत. (KL Rahul and Virat Kohli)
यामुळे विराट आणि केएलने टीम इंडियचा गाडा हाकला. संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले. टीम इंडियाचा डाव स्थिर केला. त्यानंतर वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली. दोघांमध्ये 165 धावांची भागीदारी झाली. विराट 85 धावांवर खेळत होता. तर केएलही चांगली साथ देत होता. मात्र विराट 85 धावांवर आऊट झाला. पण विराटने टीम इंडियाला विजयाच्या दारात नेऊन सोडलं मात्र दुसऱ्या बाजूला त्याचं शतक अवघ्या 15 धावांनी हुकलं.
मात्र टीम इंडियाला विजयी करुन नाबाद परतणं न जमल्याची खंत विराटच्या चेहऱ्यावर दिसत होती. विराटने ड्रेसिंग रुममध्ये पोहचल्यानंतर आपल्या स्वत:वरची नाराजी व्यक्त केली. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.