Election। पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे. छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाना आणि मिझोराममध्ये निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांनी पत्रकार परिषदेवेळी याबाबत माहिती दिली आहे.
Accident News । “कारला ओव्हरटेक करायला गेला अन्..”, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा अपघाताचा VIDEO
मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदार मतदान होणार असून ३डिसेंबरला याबाबतचा निकाल लागणार आहे. त्याचबरोबर छत्तीसगड मध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यामधील मतदान हे १७ नोव्हेंबरला होणार आहे. राजस्थान मधील मतदान हे २३ नोव्हेंबरला होणार आहे आणि तेलंगणातील मतदान हे ३० नोव्हेंबरला होणार आहे.
Baramti News । मोठी बातमी! बारामतीत भाजपचाच खासदार असणार…बैठकीत नेमकं काय ठरलं?
कोणत्या राज्यात किती मतदार?
राजस्थान – ५.२५ कोटी
मध्य प्रदेश – ५.६ कोटी
छत्तीसगड – २.०३ कोटी
तेलंगणा – ३.१७ कोटी
मिझोराम – ८.५२ लाख