Accident News । धक्कादायक! कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Accident News

Accident News । छत्रपती संभाजीनगर : सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा हे अपघात (Accident) चालकाच्या चुकीमुळे होतात. यात अनेकांचा जीव जातो. यामुळे अनेक संसार उध्वस्त होतात. सध्या असाच एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest marathi news)

Manoj Jarange । ‘…तर OBC आरक्षणच रद्द होईल’! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये मोठी खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात शिवसेना भवनासमोर त्यांच्या दुचाकीचा आणि कंटेनरचा भीषण अपघात (Accident in Chhatrapati Sambhajinagar) झाला आहे. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. अजीम सय्यद आणि आशिया सय्यद अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

Kartik Aaryan । कार्तिक आर्यनला महागात पडली ‘ती’ गोष्ट, व्हायरल व्हिडीओमुळे चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

सादर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे. परंतु, या घटनेने सय्यद कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Maratha Reservation Survey । धक्कादायक! मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना केली मारहाण

Spread the love