अपघाताच्या (accident) घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात होत आहेत. दररोज आपल्याला अपघाताच्या घटना ऐकायला मिळत आहेत. काही अपघात रस्ते खराब असल्यामुळे होत आहेत. तर काही अपघात रस्ते चांगले असून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने होत आहेत. सध्या देखील बीडमधून एक अपघाताची घटना समोर आली आहे. (An accident occurred from Beed)
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांना धमकी देणारा चंद्रशेकर बावनकुळेंसोबत केक कापतोय; फोटो व्हायरल
आरोग्य शिबिराहून परतत असताना डॉक्टरांच्या भरधाव कारने हेलकावा घेतला आणि कार झाडाला धडकून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दोन्ही डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर कारचा देखील चक्काचूर झाला आहे. या अपघातामुळे बीडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई येथील फिजिओथेरेफिस्ट डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी संतोष सातपुते (Dr. Pramod Burande and Dr. Ravi Santosh Satpute) अशी या मृत पावलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. या अपघातांची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले.