बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सतत चर्चेत असते. ती तिच्या फॅशनमुळे ओळखली जाते. सोनम कपूर प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी आहे. तिने तिच्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. सोनम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. यादरम्यान सध्या सोनम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोनमने एक धक्कादायक खुला केला आहे.
Accident | आरोग्य शिबिराहून परतताना डॉक्टरांच्या गाडीचा भीषण अपघात; २ जण जागीच ठार
सोनम कपूर म्हणाली की, “सर्व व्यक्ती लहानपणी कधी ना कधी लैंगिक शोषणाचा बळी पडतात. मी देखील लहान असताना माझ्यासोबत सुध्दा असे झाले होते. माझा देखील विनयभंग झाला होता. त्यावेळी माझ्याबरोबर भयंकर मोठा अपघात झाला होता. मात्र, ही गोष्ट सांगण्याची माझी कधीच हिम्मत झाली नाही. पण आजतागायत ती गोष्ट मी विसरले नाही. आजही जशीच्या तशी ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो.”
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांना धमकी देणारा चंद्रशेकर बावनकुळेंसोबत केक कापतोय; फोटो व्हायरल
“मी 13 वर्षांची असताना मुंबईतील गेटी गॅलेक्सी थेएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी गेली होती. त्यावेळी माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी देखील होत्या. तेव्हा आम्ही खाऊ घेण्यासाठी दुकानात गेलो होतो. मी दुकानात उभा असताना माझ्या पाठीमागून एक माणूस आला आणि त्याने माझे स्तन दाबले. तेव्हा मी प्रचंड घाबरली होती. म्हणून मी मोठ मोठ्याने रडायला लागले. त्यानंतर मी चित्रपट संपूर्ण बघितला पण यावेळी मी चुकी केली आहे ही एक गोष्ट मनात सतावत होती, असे सोनम कपूरने सांगितले.