राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना काल सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. राज्याचे राजकारण देखील चांगलेच तापले. शरद पवार यांना दोन जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामध्ये पहिली धमकी ही ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरुन देण्यात आली आहे. तर दुसरी धमकी ही ट्विटरवरून ‘सौरभ पिंपळकर’ (Saurabh Pimpalkar) नावाच्या व्यक्तीने दिली आहे.
यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी देखील गृहमंत्र्यांकडे केली आहे. सौरभ पिंपळकर हा भाजपचा (BJP) कार्यकर्ता असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आणि आता यामध्येच अमोल मिटकरी Amol Mitkari() यांनी एक फोटो ट्विट केला आहे.
अमोल मिटकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यासोबत सौरभ पिंपळकर केक कापतानाचा एक फोटो ट्विट केला आहे आणि कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय , ‘राजकारण महाराष्ट्राचे’ ‘नर्मदाबाई पटवर्धन’ सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. अमोल मिटकरींच्या ट्विटवर आता चंद्रशेखर बावनकुळे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘या’ कारणामुळे लग्नाच्या पहिल्या रात्रीच झाला नवरा बायकोचा मृत्यू; वाचून हादराल
हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय , 'राजकारण महाराष्ट्राचे' 'नर्मदाबाई पटवर्धन' सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे?#कराराजवाबमिलेगा@cbawankule pic.twitter.com/G6kBdbnw2O
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 9, 2023