Accident | मध्य प्रदेशातील गुना येथे एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास डंपर आणि बसमध्ये जोरदार धडक झाली, त्यामुळे बसने पेट घेतला. यादरम्यान 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. रुग्णालयात नेत असताना आणि रुग्णालयात उपचारादरम्यान या प्रवाशांचा मृत्यू झाला. सुमारे 15 जण गंभीर आहेत. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.
Electronic Soil । ‘इलेक्ट्रॉनिक माती’ची बातच न्यारी, 15 दिवसांत पिकाची होईल दुपटीने वाढ
माहितीनुसार, या दुर्घटनेत 12 जणांचा गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू झाला आहे. तर अद्याप 14 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला होता.
Maratha Reservation । गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही – मनोज जरांगे पाटील
याशिवाय 12 पेक्षा अधिक लोक गंभीररीत्या भाजले. या सर्वांना १० हून अधिक रुग्णवाहिकांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले. बजरंगगड पोलीस स्टेशन हद्दीतील डोहई मंदिराजवळ हा अपघात झाला. बसचा नादुरुस्तपणा हे अपघाताचे कारण असल्याची माहितीही समोर आली आहे. म्हणजे बसची अवस्था अत्यंत वाईट होती, तरीही त्यात प्रवाशांची वाहतूक केली जात होती.
Viral Video । गरुडाने रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीचा काढला डोळा, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल