Electronic Soil । ‘इलेक्ट्रॉनिक माती’ची बातच न्यारी, 15 दिवसांत पिकाची होईल दुपटीने वाढ

What is Electronic Soil

Electronic Soil । प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा (Technology) वापर वाढला आहे. यात कृषी क्षेत्रही (Technology in agriculture sector) मागे राहिले नाही. कृषी क्षेत्रातदेखील तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. याचा उत्पन्नावरही परिणाम होतो. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांची मेहनत कमी झाली आहे. अशातच आता वैज्ञानिकांनी इलेक्ट्रॉनिक मातीचा शोध लावला आहे. यामुळे 15 दिवसांत पिकाची दुपटीने वाढ होते. (Latest Marathi News)

Maratha Reservation । गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही – मनोज जरांगे पाटील

ही माती म्हणजे एक मिनरल न्यूट्रियंट सोल्यूशन (Mineral Nutrient Solution) असून यात पिकांची वाढ ही 50 टक्के जास्त होते, असा दावा संशोधकांनी केला आहे. लिंकपिंग विद्यापीठाच्या (Linkping Universities) वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून मिनरल न्यूट्रियंट सोल्यूशनमध्ये शेती करण्याच्या प्रक्रियेला हायड्रोपोनिक्स (Hydroponics) म्हटले आहे. यामध्ये मातीचा वापर करण्यात येत नाही. सोल्यूशनमध्ये पिकांची वाढ होते. (What is Electronic Soil)

Viral Video । गरुडाने रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीचा काढला डोळा, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करता या हटक्या तंत्रज्ञानाचा शोधन लावण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी विजेचा वापर करण्यात येतो. याच कारणामुळे याला इलेक्ट्रॉनिक सॉईल असं म्हटले आहे. अनेक ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जात आहे. यामुळे पिकांची वाढ वेगाने होते. तुम्हाला 15 दिवसांमध्ये 50 टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळेल.

AI म्हणजे नक्की काय भानगड आहे? जाणून घ्या, कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल काही खास गोष्टी!

Spread the love