
सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला (Nalsab Mulla) यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला . गोळीबाराच्या या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण शहर हादरलं आहे. त्यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या असल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनासथळी दाखल झाले. पोलिसांनी या हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरु केला आहे.
दिवसाढवळ्या तरुणाने केली महिलेला बेदम मारहाण; व्हिडीओ झाला व्हायरल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संधीचा फायदा घेत हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर एकूण आठ गोळ्या झाडल्या आहेत. शहरातील 100 फुटी जवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या राहत्या घराच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. त्यांच्यावर आठ राऊंड फायर केले असून यापैकी त्यांच्या डोक्याला 2-3 गोळ्या लागल्या होत्या.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर झाडल्या गोळ्या…
नालसाब मुल्ला यांची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. अलीकडील काळात ते राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची देखील नोंद आहे. माहितीनुसार, नालसाब हे शनिवारी रात्री आपल्या राहत्या घराच्या बाहेर बसले होते. यावेळी चार अज्ञात त्यांच्या घराजवळ आले. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली अन् त्यावेळी त्या अज्ञात लोकांनी गोळ्या झाडल्या आणि नालसाब यांची हत्या केली. या घटनेने संपूर्ण सांगली शहर हादरलं आहे.
Nitin Gadkari On Congress । ‘एकवेळ विहिरीत उडी मारून जीव देईल पण काँग्रेसमध्ये कदापि जाणार नाही’