Bus Accident । बसचा भीषण अपघात! 20 प्रवासी जखमी

A terrible bus accident! 20 passengers injured

Bus Accident । देशात सतत कोठे ना कोठे अपघात (Accident) होतात. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात तर काहीजण जखमी होतात. परंतु या अपघातामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. बहुतांश अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात. सध्या असाच एक अपघात झाला आहे. यात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)

New Rule । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! जन्म दाखल्याने झटक्यात होणार कोणतंही काम

रामदुर्ग तालुक्यातील बिजगुप्पी (Ramdurg Bijaguppi) गावाजवळ केएसआरटीसी या बसला अपघात झाला. ही बस काल हुलकुंदहून रामदुर्गला जात होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस झाडावर जाऊन गाडी आदळली. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बसमध्ये 50 पेक्षा जास्त प्रवासी होते. अपघातात बसच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे.

Maharashtra Politics । ठाकरे गटाच्या ‘त्या’ खासदारांना शिंदे गट पाठवणार नोटीस, नेमकं कारण काय?

अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींवर खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु दोन शिक्षकांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात आणि वैद्यकीय उपचाराला वेळ लागल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला हजर राहता आले नाही.

Onion Rate । कांद्याला येणार अच्छे दिन? दिल्लीत होणार महत्त्वाची बैठक

Spread the love