Onion Rate । कांद्याला येणार अच्छे दिन? दिल्लीत होणार महत्त्वाची बैठक

Good day for onions? Important meeting to be held in Delhi

Onion Rate । मुंबई : कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांना खूप कमी किमतीत कांदा विकावा (Onion Price) लागत आहे. त्यातून त्यांचा वाहतूक आणि मजुरीचाही खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. अशातच सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क (Export charges) लावण्यात आला आहे. त्यामुळे सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना पसरली आहे. (Latest Marathi News)

Kangana Ranaut । कंगनाची होणार राजकारणात एन्ट्री? म्हणाली; “आगामी निवडणुकीत भगवा रंग…”

दरम्यान, लोकप्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि एनसीसीएफ यांनी शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी करत आहे. आता याच संदर्भात २९ सप्टेंबर रोजी दिल्लीत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी सांगितले आहे. या बैठकीत तरी कांदाप्रश्नावर तोडगा निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Fire Accident । हृदयद्रावक! लग्न समारंभात लागलेल्या आगीमध्ये १०० जणांचा मृत्यू तर १५० जण जखमी

तसेच नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी लिलाव बंदीचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन गोयल यांनी केले आहे. सरकारने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत कांदा खरेदीचा निर्णय फायद्याचा ठरला. मात्र, व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ लागले. त्यामुळे नाशिकमध्ये कांदा लिलाव बंद आहे.

Shivsena MLA Disqualification Case । बिग ब्रेकिंग! ‘या’ दिवशी होणार आमदार अपात्रता प्रकरणाची अंतिम सुनावणी

Spread the love