Winter Session । हिवाळी अधिवेशनाला दुसरे मुख्यमंत्री असणार, शरद पवार गटाचा मोठा दावा

Sharad Pawar group's big claim is that there will be a second chief minister in the winter session

Winter Session । राज्यात सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकार आहे. या सरकारला सतत विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागते. अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष खूप टोकाला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे सत्तेत सामील झाल्यापासून लवकरच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्रीपद जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता शरद पवार (Sharad Pawar) गटाने मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा दावा केला आहे. (Latest Marathi News)

Bus Accident । बसचा भीषण अपघात! 20 प्रवासी जखमी

“नोव्हेंबरपर्यंत शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवर निर्णय येऊ शकतो. आमचा संविधानावर पूर्ण विश्वास असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शेड्युल्ड 10 नुसार कारवाई केली तर हिवाळी अधिवेशनापूर्वी एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाऊ शकते,” असा मोठा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

New Rule । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! जन्म दाखल्याने झटक्यात होणार कोणतंही काम

ते कल्याण येथे बोलत होते. “महायुतीचा कोणीही उमेदवार असला तरी कल्याण आणि भिवंडी या दोन्हीही लोकसभा मतदारसंघांमध्ये इंडिया आघाडीला मोठा प्रतिसाद सर्वसामान्य जनतेमधून मिळेल. तसेच आगामी निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचाच उमेदवार निवडून येईल,” असा विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra Politics । ठाकरे गटाच्या ‘त्या’ खासदारांना शिंदे गट पाठवणार नोटीस, नेमकं कारण काय?

Spread the love