Vaishnavi Hagawane Case | हगवणे प्रकरण: मकोका लागणार का? फडणवीसांचे सूचक विधान, राज्यभरात चर्चेला उधाण

Vaishnavi Hagawane Case

Vaishnavi Hagawane Case | वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सासरच्या पाच सदस्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला गती दिली असून, आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात सासू लता हगवणे, पती शशांक, नणंद करिश्मा, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांचा समावेश आहे.

Vaishnavi Hagavane Suicide Case । वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे पिता-पुत्र फरार; तपासात धक्कादायक माहिती समोर

या गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मकोका (MCOCA) लावण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. “स्त्रियांवर होणारा अन्याय हा २१व्या शतकात अक्षम्य पाप आहे. पोलिसांनी कठोर कारवाई केली असून, ती न्यायाच्या अंतिम टप्प्यापर्यंत नेली जाईल,” असं ते म्हणाले. मात्र मकोका लागू करण्यासाठी ठराविक कायदेशीर निकष असतात आणि हे प्रकरण त्या चौकटीत बसतं का, हे तपासाअंती स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितलं.

Farmer News । शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा

फडणवीस यांनी वैष्णवीच्या मृत्यूमागील घरगुती छळ, मानसिक अत्याचार व हुंडाबळीच्या शक्यतेकडे लक्ष वेधले. त्यांनी पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट सूचनाही दिल्या असून, पुराव्यांच्या आधारे दोषारोप सादर करण्यात येणार आहेत. सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वैष्णवीच्या कुटुंबाला न्याय मिळेल का आणि मकोका लावण्याचा निर्णय काय घेतला जाईल, याकडे लागलेलं आहे.

Havaman Andaj । सावधान, महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा; ‘या’ ठिकाणी अलर्ट जारी

Spread the love