
Crime News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हाँगकाँगमध्ये (Hong Kong) एका भारतीय व्यक्तीने दक्षिण कोरियन महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायकी प्रकार समोर आला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही घटना कॅमेरात रेकॉर्ड देखील झाली आहे. महिला लाईव्ह स्ट्रीम करत असताना ही घटना कॅमेरा रेकॉर्ड झाली आहे. सध्या याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
पीडित महिलाही ट्विच या ऑनलाईन ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवरलाईव्ह स्ट्रीम करत असतानाच हा सगळा धक्कादाय प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चांगली संतापाची लाट उसळली आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पीडित महिला अस्वस्थ दिसत आहे. यावेळी भारतीय तरुणांनी तिला वारंवार स्पर्श करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. वलॉगर असलेली महिला हॉंगकॉंगच्या तिच्या सहलीचे रेकॉर्डिंग करत होती त्यावेळी हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
Pune News | पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींचा घोटाळा, धक्कादायक माहिती आली समोर
Twitch streamer was sexually assaulted live in Hong Kong by a stranger. pic.twitter.com/7YwWkrQjLy
— DramaAlert (@DramaAlert) September 11, 2023
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबाबतचा तपास सुरू केला यानंतर अमित अशी असं आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडिया युजरने या आरोपीला शोधून काढलं मात्र आता या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.
Accident News । भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसचा टँकर पलटी