Zika Virus Case । झिका व्हायरस महाराष्ट्रात आल्याने खळबळ, पुण्यात दोन रुग्ण आढळले; डॉक्टर आणि त्यांची मुलगी पॉझिटिव्ह

Pune Zika Virus

Zika Virus Case । सध्या महाराष्ट्रात झिका व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. पुणे शहरात एक डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे. पुणे महानगपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

High Court on Hijab । ब्रेकिंग! शाळा-महाविद्यालयांमध्ये बुरखा घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय

पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, डॉक्टरांना ताप आणि अंगावर पुरळ उठले, त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाने त्यांच्या रक्ताचे नमुने येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यांनी सांगितले की 21 जून रोजी अहवाल आला होता, ज्यामध्ये डॉक्टरांना झिका व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली.

Pune Zika Virus | सावधान! पुण्यात आढळले झिका व्हायरसचे 2 रुग्ण; उडाली मोठी खळबळ

त्यांनी सांगितले की, डॉक्टर पुण्यातील एरंडवणे भागातील रहिवासी आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, “डॉक्टरला संसर्ग झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांचे रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले. तपासात त्याच्या 15 वर्षांच्या मुलीला संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Monsoon Session । पावसाळी अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीने बोलावली बैठक; विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत

Spread the love