
क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्याबद्दल तसेच त्याच्या पगाराबाबत माहिती जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. कोणत्या खेळाडूला किती पगार मिळतो हे जाणून घेण्यास क्रिकेप्रेमींमध्ये नेहमीच उत्सुकता असते. दरम्यान आज आम्ही तुम्हाला क्रिकेटपटूंच्या पगाराबाबत महत्वाची माहिती देणार आहोत. भारत आणि पाकिस्तान मधील महिला क्रिकेटपटूंना किती पगार मिळतो तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मात्र भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंच्या पगारात खूप मोठा फरक आहे. खरंतर भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंचा पगार अ, ब आणि क या तीन श्रेण्यांमध्ये दिला जातो.
मोठी बातमी! सुपरस्टार अमिताभ बच्चनच्या घरी होणार बॉम्बस्फोट? ‘त्या’ कॉलमुळे पोलिसांची उडाली धावपळ
भारतातील महिला क्रिकेटपटूंचे वेतन
भारतीय महिला क्रिकेटपटूंना ( Indian woman cricketers) अ,ब आणि क श्रेणीत खालीलप्रमाणे मानधन दिले जाते.
1) अ श्रेणीतील खेळाडूंसाठी 50 लाख रुपये
2) ब श्रेणीसाठी खेळाडूंसाठी 30 लाख रुपये
3) क श्रेणीतील खेळाडूंना 10 लाख रुपये
स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर यासारख्या अव्वल खेळाडू भारतात अ श्रेणीत येतात. त्यामुळे त्यांना 50 लाख इतके मानधन भेटते.
पाकिस्तान मधील महिला क्रिकेटपटूंचे वेतन
पाकिस्तानी महिला क्रिकेटपटूंना ( Pakistani woman Cricketers) सुद्धा अ,ब आणि क श्रेणीत खालीलप्रमाणे मानधन दिले जाते.
1) अ श्रेणीतील खेळाडूंसाठी 52 हजार 47 रुपये
2) ब श्रेणीसाठी खेळाडूंसाठी 41 हजार 117 रुपये
3) क श्रेणीतील खेळाडूंना 30 हजार 708 रुपये
पाकिस्तान महिला क्रिकेट संघात सना मीर, निदा दार या खेळाडू अ श्रेणीमध्ये येतात. त्यांना 52 हजार 47 एवढे वेतन भेटते.
बँकेतील कामे लवकर आटपा! मार्च महिन्यात तब्बल १२ दिवस बंद राहणार बँका, पाहा तारखा
दरम्यान इतर अनेक गोष्टींमध्ये असलेल्या मागासलेपणा प्रमाणे पाकिस्तानमध्ये महिला क्रिकेटर्सना पगार देण्यात सुद्धा मागासलेपण आहे. या तुलनेत भारत महिला क्रिकेटपटूंना मानधन देण्याच्या बाबतीत पाकिस्तान पेक्षा फार आघाडीवर आहे.