
माणसांचे हृदय ( Heart) हे प्रचंड नाजूक असते. यामुळे त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. जगातील बहुतांश लोकांचा मृत्यु हृदयाशी संबंधित झालेल्या आजारांमुळेच झाले आहेत. बऱ्याचदा हृदयाच्या आजाराचे लवकर निदान होत नाही. यामुळे आजार जास्त बळावत जातो आणि पुढे जाऊन त्याचे गंभीर परिणाम होतात. दरम्यान हृदयात काही गडबड असेल तर त्याची लक्षणे डोळयांत दिसतात. याबाबतचे एक संशोधन देखील प्रसिद्ध झाले आहे.
‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’च्या संशोधनानुसार, उच्च बीपीमुळे रक्तदाब वाढतो. या स्थितीत रेटिनोपॅथी होऊ शकते. यामुळे तुमच्या डोळ्यांच्या नसांमध्ये रक्त जाते. त्यानंतर हळूहळू रक्त गोठण्यास सुरुवात होते. तसेच डोळ्यांच्या शिरा फुटू शकतात व प्रकाशही जाऊ शकतो. रेटिनाला कर्व्ह येणेया आजारात डोळयातील पडदा कोरडे होण्याबरोबरच आकुंचन पावू लागते. त्यामुळे दृष्टी पूर्णपणे नष्ट होते.
भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंमधील वेतनाचा फरक वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
हृदयाशी संबंधित आजारांमुळे डोळ्यांमध्ये ( Eyes) मोतीबिंदू होऊ शकतो, महत्त्वाची बाब म्हणजे मोतीबिंदूच्या ऑपरेशन दरम्यान हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातामुळे मृत्यूचा धोका असतो. खरंतर हृदयाच्या धमन्यांमध्ये जेव्हा प्लेक तयार होतो. तेव्हा डोळ्यांपर्यंत पोहोचणारे रक्त कमी होते. यामुळे बहुतांश वेळा डोळ्यातील पडदा नष्ट होऊन दृष्टी कमी होते. तेव्हा डोळ्यांशी संबंधित अशी लक्षणे दिसताच वेळीच सावध होणे आणि उपचार घेणे आवश्यक आहे.
मोठी बातमी! सुपरस्टार अमिताभ बच्चनच्या घरी होणार बॉम्बस्फोट? ‘त्या’ कॉलमुळे पोलिसांची उडाली धावपळ