Ravikant Tupkar । “…तर शेतकरी सत्ताधाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही”, रविकांत तुपकर यांचा गंभीर इशारा

Ravikant Tupkar

Ravikant Tupkar । रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायमच लढत असतात. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी ते कायम आंदोलन देखील करत असतात. मागच्या काही दिवसापासून सोयाबीन आणि कापसाचे दर खूप कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता रविकांत तुपकर यांनी सरकारला एक गंभीर इशारा दिला आहे.

Pomegranate Rate । युवा शेतकऱ्याच्या कष्टाचं झालं सोनं! डाळिंबाला मिळाला ८०० रुपये किलोचा दर; कमावले लाखो रुपये

सोयाबीन पिकाच्या उत्पादनाला मिळणारा भाव आणि उत्पादन खर्च यात बरीच तफावत असून आजही मागच्या वर्षीचा कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांकडे पडून आहे. आता सोयाबीन आणि कापसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था हलाखीची असून जखमी वाघासारखा तो संतापलेला आहे. या वाघानं आता संघर्षाचा पंजा उचलला तर सरकारला पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही. एक भूमिपुत्र आणि शेतकऱ्याचा लेक म्हणून मी या शेतकऱ्यांबरोबरच आहे, तरीही सरकारला माझी नम्र विनंती आहे की आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

Pm Kisan Yojana । आताची सर्वात मोठी बातमी! शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता

त्याचबरोबर पुढे बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, आज (Farmer) शेतकरी अडचणीतच नाही तर आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. याबाबत सरकारला काहीच फिकीर नाही. आता जस कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्र्यांना अडविले आहे. तसेच सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी या सत्ताधाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही असे देखील रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

Kisan Mandhan Yojana । सरकारची नवीन योजना! दरमहा शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपये, असा करा अर्ज

Spread the love