मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी गिरणी कामगार (Mill worker) आणि त्यांच्या वारसांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. या कामगारांसाठी लवकरच 5 हजार घरांची सोडत होणार आहे. त्यांना केवळ मुंबईतच नाही तर त्यांना त्यांच्या गावाजवळ तसेच तालुक्याजवळही घर घेता येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी म्युझियम होईल त्या ठिकाणी गिरणी कामगारांच्या वारसांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. (Latest Marathi News)
Pankaj Tripathi | ब्रेकिंग! पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन
“मुंबईच्या (Mumbai) जडणघडणीमध्ये गिरणी कामगारांचा मोठा वाटा आहे. परंतु, अनेक गिरणी कामगार घरापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने (State Govt) यावर गांभीर्याने गिरीणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीसी मिलच्या विकासाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. त्या जागांवरही गिरणी कामगारांना घरे दिली जातील,” असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असू शकते? काय सांगतो कायदा जाणून घ्या
मुंबई एमएमआरमध्ये हाऊसिंग स्टाफमध्ये वाढ करणे किंवा मुंबईच्या बाहेर जे गिरणी कामगार त्यांच्या गावाजवळ, गावाजवळील शहरात किंवा तालुक्याजवळ घर घेऊ इच्छित आहेत ते इच्छिक आपण ठेवले आहेत. पनवेल आणि कल्याणमधील घरांच्या डागडुजी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. लवकरच 5 हजार घरांची लॉटरी ताबोडतोब काढली जाणार आहे, असे शिंदे यांनी जाहीर केले आहे.
Wheat Variety । शास्त्रज्ञांनी तयार केले गव्हाचे 3 वाण, 150 दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन