जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडणार? भाजपने सांगितलं मोठं कारण; व्हायरल ट्विटने उडाली खळबळ

Jayant Patil

राज्यातील सत्तेत बदल झाल्यानंतर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत. मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे राष्ट्रवादी (NCP) सोडणार आहेत असा खळबळजनक दावा भाजपने केला होता. अशातच आता भाजपने (BJP) जयंत पाटीलांनी राष्ट्र्रवादी सोडण्याची भाजप नेत्याने १० मोठी कारणे सांगितली आहेत. त्यामुळे आता जयंत पाटील खरंच राष्ट्रवादीची साथ सोडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

शेतकऱ्यांनो पेरणी करत असाल तर थांबा! कृषी विभागाचा अंदाज जाणून घ्या मगच पेरणी करा

  • शरद पवार यांनी 2019 नंतर जयंत पाटील यांना गृहमंत्रीपद देण्याऐवजी जलसंधारण मंत्रीपद दिले.
  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार असे दोन गट आहेत, परंतु जयंत पाटील कोणत्याच गटात नाहीत.
  • जयंत पाटील यांना आपण केवळ नामधारी प्रदेशाध्यक्ष आहे असे वाटत आहे. कारण सुप्रिया सुळे (Supriya Sule) आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा झाल्या असून राज्य स्तरावरील सर्व निर्णय अजित पवार घेतात.
  • जर आता प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांकडे गेले तर जयंत पाटील कुठे जाणार?
  • महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद दिले नाही.

प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने स्पष्ट सांगितले

  • जयंत पाटील यांचा शरद पवार यांनी सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचा विचार केला.
  • शरद पवारांनी राजीनामा घेतला तर वयाने लहान असणाऱ्या सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या हाताखाली जयंत पाटील कसे काम करतील.
  • जयंत पाटील यांच्या मुलाला राजकारणात आणायचे आहे, परंतु शरद पवार लक्ष देत नाहीत.
  • शरद पवारांनी पार्थ पवारला जबाबदारी दिली नाही मग जयंत पाटील यांच्या मुलाला कशी संधी मिळणार?
  • जयंत पाटील यांना राष्ट्रवादीत भविष्य दिसत नाही, त्यामुळे तर पक्ष सोडू शकतील.

प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने स्पष्ट सांगितले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *