शेतकऱ्यांनो पेरणी करत असाल तर थांबा! कृषी विभागाचा अंदाज जाणून घ्या मगच पेरणी करा

Cultivation

अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची (Rain) आतुरतेने वाट पाहत होते. कारण पावसाने यावर्षी राज्यात उशिरा हजेरी लावली असल्याने राज्यातील पेरण्या रखडल्या होत्या. अशातच मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची बियाणे (Seeds) खरेदी करण्याची लगबग सुरु झाली आहे. (Latest Marathi News)

प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने स्पष्ट सांगितले

परंतु, जर तुम्ही पेरणी करत असाल तर कृषी विभागाचा (Department of Agriculture) अंदाज जाणून घ्या मगच पेरणी करा. नाहीतर तुमच्यावर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा निर्माण झाला तर बियाणे खरेदी करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बियाणे खरेदी करत असताना ती योग्यरीत्या तपासून घ्या आणि खरेदी करा, असे आवाहन कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी सांगितला शरद पवारांचा ‘तो’ किस्सा म्हणाले, ‘राजकारणाचा आखाडा …’

पिकांसाठी युरिया, डी. ए. पी., एम. ओ. पी., एस. एस. पी., एन. पी. के. यांसारख्या खतांची १३ हजार २५४ टन मागणी कृषी विभागाकडून केली आहे. दरम्यान मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच या आणखी ५ दिवस या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

भाजपला सर्वात मोठा धक्का! शेकडो कार्यकर्त्यांनी केला ठाकरे गटात प्रवेश

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *