‘महाराष्ट्र दौरा करण्यापेक्षा कोण मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष होणार? या घरातल्या वाटण्या करा’

मागील काही दिवसांपूर्वी एका आयोजित कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदांमध्ये काहीही रस नाही. मला आता संघटनेत काम करण्याची इच्छा आहे. प्रदेशाध्यक्षपदावर राहून पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त काम करता येऊ शकते, असे पवारांनी बोलून दाखवले होते. तसेच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) किंवा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मागणी केली होती. (Latest Marathi News)

फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला शरद पवारांनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे..’

यावरून आता भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला केला आहे. “त्यांचा हा अंतर्गत विषय असून त्यांनी एक साथ मेळावा, महाराष्ट्र दौरा न करता कोण मुख्यमंत्री आणि कोण प्रदेशाध्यक्ष होणार? या घरातल्या वाटण्या करून घ्या, आणि मग जनतेला आश्वस्त करायचं काम त्यांनी केलं पाहिजे,” असा खोचक टोला हाणला आहे.

‘पहिल्याच पावसात सरकार वाहून गेलं, अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे’, सामानातून सरकारवर बोचरी टीका

दरम्यान, आगामी निवडणुकांची सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कायम जुंपल्याचे दिसत आहे. अशातच आता सुजय विखे पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशाप्रकारे प्रत्त्युत्तर देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Darshana Pawar । ‘अगोदर कटरने गळा चिरला, मग दगडाने डोकं ठेचलं..; राहुलने दिली खुनाची कबुली

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *