कौतुकाचा वर्षाव होताना लेशपाल जवळगे याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाला,’ मी शेतकरी कुटुंबातला…’

Leshpal and Harshad

राज्यात दर्शना पवार (Darshana Pawar) हत्या प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एमपीएससी (MPSC) परिक्षेची तयारी करणाऱ्या एका तरूणीवर तिच्याच मित्राकडून सदाशिव पेठेत कोयत्याने भरदिवसा हल्ला करण्यात आला आहे. लेशपाल जवळगे (Leshpal Javalage) आणि हर्षद पाटील (Harshad Patil) या दोन तरूणांच्या धाडसामुळे या तरुणीचे प्राण थोडक्यात वाचले आहे. या घटनेनंतर हे दोन तरुण चर्चेचा विषय बनले आहे. (Latest Marathi News)

सर्वात मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटासाठी दोन केंद्रीय मंत्र्यांना वगळलं जाणार

सोशल मीडियावरही त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. राजकीय पक्षनेत्यांनीही त्या तरुणांच्या धाडसाचे कौतूक केले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी या दोन तरुणांचा सत्कार करून त्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले. त्यावरून आता या दोन्ही तरुणांनी त्यावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मुलाखतीनंतरही होणार आणखी एक परीक्षा

लेशपाल बोलताना म्हणाला की ‘मागच्या दोन तीन दिवसांपासून इतके कौतुक होत आहे की ते मला झेपतच नाही. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या तरूणांच्या डोळ्यात काही स्वप्न असतात. घरून पैसे घ्यायला कसं तरी वाटतं. परंतु आता या मिळालेल्या रकमेतून थोडीशी आर्थिक मदत होईल. तसेच ती घटना घडली तेव्हा कौतुक वगैरे हे काहीही डोक्यात नव्हतं. फक्त ती मुलगी वाचवी एवढंच वाटत होतं, असे हर्षद म्हणाला.

पशुपालकांनो.. तुम्हालाही स्वच्छ आणि निर्भळ दूध उत्पादन घ्यायचंय? तर मग ‘हे’ काम कराच

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *