Sushant Singh Rajput Case । आपल्या अभिनयाच्या जोरावर सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) लहान पडद्यावरुन थेट मोठ्या पडद्यावर उडी घेतली होती. त्यामुळे घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. परंतु २०२० मध्ये झालेल्या त्या एका घटनेने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये (Bollywood industry) एकच खळबळ उडाली आहे. अजूनही पोलिसांना त्याची हत्या झाली की आत्महत्या? याचा तपास लावता आला नाही.
कौतुकाचा वर्षाव होताना लेशपाल जवळगे याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाला,’ मी शेतकरी कुटुंबातला…’
अजूनही त्याच्या मृत्यूचा तपास सुरु आहे. ३ वर्षांपासून सुरु असलेल्या या चौकशीदरम्यान अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच आता त्याचा हत्येचा आणि अमेरिकेचा संबंध जोडला जात आहे. 2021 मध्ये प्रीमियर अँटी करप्शन एजन्सीकडून (Premier Anti-Corruption Agency) कॅलिफोर्निया (California) येथे असणारे मुख्यालय Google आणि Facebook यांना सुशांतने डिलिट केलेले सर्व चॅट, ईमेल किंवा पोस्टची माहिती द्यावी ज्याचे विश्लेषण करून त्यांना घटनांची पार्श्वभूमी समजण्यास मदत होईल, अशी औपचारिक विनंती पाठवण्यात आली होती.
सर्वात मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटासाठी दोन केंद्रीय मंत्र्यांना वगळलं जाणार
जर त्यांची विनंती मान्य झाली तर काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागू शकतात. नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे सापडले असल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान सुशांतचे कुटुंबिय आणि त्याचे चाहते लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लागावा याची मागणी करत आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मुलाखतीनंतरही होणार आणखी एक परीक्षा