
Rain Update । पुणे : देशात यंदा पावसाने (Rain) उशिरा हजेरी लावली होती. जून महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण वाढले (Heavy Rain in Maharashtra) होते त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला होता. त्यात ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वचजण पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता दिलासादायक बातमी आहे. (Latest Marathi News)
Politics News । शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र, ‘या’ विषयावर झाली चर्चा
भारतीय हवामान खात्याकडून 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची शक्यता (IMD Update) वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही भागात पावसाचा जोर कायम राहील. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात पावसाचे आगमन होईल. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस होऊ शकतो.
राज्यात सध्या तुरळक पाऊस सुरु आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक झालेला आहे. त्यामुळे यावर्षी पुणे शहरावरचे पाणी कपातीचे संकट टळले आहे. परंतु जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवर संकट आले आहे.
Business idea । बंपर कमाईची संधी! लाल भेंडीची लागवड करून मिळवा २५ लाखांचा नफा
पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर पिके कशी वाचवायची हा प्रश्न पडला आहे. त्याशिवाय राज्यातील बहुतांश भागात अजूनही पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही. जर येत्या काळात अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट येईल.
Sushmita Sen । अभिनेत्री सुष्मिता सेनची खालावली प्रकृती, वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय