Chili Production । तिखट मिरचीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा! अवघ्या 3 महिन्यातच घेतले 55 लाखांचे उत्पन्न

Hot pepper brought sweetness to the life of the farmer! 55 lakhs income taken in just 3 months

Chili Production । शेतकऱ्यांनी जर बाजारपेठेचा अभ्यास करून शेती (Agriculture) केली तर त्यांना शेतीतून चांगली कमाई करता येईल. अनेक शेतकरी बाजारपेठेचा नेमका अभ्यास करून पिकांची लागवड करत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी मिरचीची लागवड करत आहेत. मागील वर्षी मिरचीला पाहिजे तसा हमीभाव (Chili Price) मिळाला नाही. परंतु यंदा मिरची पिकातून शेतकरी लखपती (Chili Rate) झाले आहेत. (Latest Marathi News)

Business idea । बंपर कमाईची संधी! लाल भेंडीची लागवड करून मिळवा २५ लाखांचा नफा

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा या गावचे इक्बालखा पठाण हे मागील 16 वर्षापासून ते मिरचीची लागवड (Chili Cultivation) करत आहेत. प्रत्येक वर्षी त्यांची या पिकातून कमाई झालीच असे नाही. परंतु यावर्षी योग्य ते नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांना अवघ्या 3 महिन्यातच 55 लाख रुपयांचे उत्पन्न घेण्यात यश आले आहे.

Sushmita Sen । अभिनेत्री सुष्मिता सेनची खालावली प्रकृती, वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय

या वाणांची केली लागवड

यंदाच्या वर्षी त्यांनी एकूण अकरा एकर शेतात मिरचीची लागवड केली होती. त्यांनी एप्रिल महिन्यात मिरचीचे शिमला, पिकाडोर, बलराम आणि तेजा यासारख्या वाणांची लागवड केले होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वाणांना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांनी मिरचीची विक्री सुरु केली.

Post Office Saving Schemes । पोस्ट ऑफिसची पती-पत्नीसाठी शानदार योजना, होईल 59,400 रुपयांचा फायदा

कमाई

जर कमाईबद्दल बोलायचे झाले तर शिमला मिरची 40 ते 45 रुपये प्रति किलो, बलराम वाणाच्या मिरचीला 71 रुपये प्रति किलो आणि पिकाडोर मिरची 65 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला. त्यातुन त्यांना आतापर्यंत 55 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांच्याकडे आणखी मिरची शिल्लक असून त्यातून त्यांना लाखोंची कमाई करता येईल, असा विश्वास आहे.

Politics News | ‘या’ कारणास्तव काका- पुतण्याची भेट झाली असावी, भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Spread the love