Ajit Pawar । राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

Ajit Pawar

Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांना आता पक्षाचे निवडणूक चिन्ह वापरता येणार आहे. आयोगाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, सर्व पुराव्यांच्या आधारे अजित यांचा गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानला जात आहे. आता या निकालानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

NCP Party and Symbol । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल जाहीर; ‘राष्ट्रवादी’ अजितदादांचीच

केंद्रीय निवडणूक आयागोच्यानिर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘निवडणूक आयोगाचा निकाल विनम्रपणाने स्वीकारत आहे, अशी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Narvekar । राष्ट्रवादीचा निकाल केव्हा लागणार? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं..

दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाची प्रतीक्षा होती. तो निकाल आज अखेर जाहीर झाला. आजच्या सुनावणीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांच्या गटाचे दिग्गज नेते देखील या सुनावणीला हजर होते. स्वतः शरद पवार सुनावणीला हजर असून देखील अजित पवार यांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Accident News । हृदयद्रावक! ट्रक-दुचाकीची भीषण धडक, अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू

Spread the love