Sharad pawar And Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ७ तारखेला अनेक मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे बडे नेते जोरदार प्रचार करताना दिसतायेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Sharad pawar And Uddhav Thackeray) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
KPK Jeyakumar । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! काँग्रेस नेत्याचा मृतदेह आढळला जळालेल्या अवस्थेत
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीबाहेर निघूण जाण्यास सांगितले असल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ हा 12 सेकंदाचा असून त्या व्हिडीओमध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीच्या बाहेर जाण्यास सांगितल्याचा दावा भाजप नेते जितेन गजारिया यांनी केला आहे. पण हा व्हिडीओ खोटा असल्याचे देखील अनेकजण बोलत आहेत.
Rohit Pawar News । रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का; कट्टर समर्थक करणार अजित पवार गटात प्रवेश
व्हिडोत नेमकं काय आहे?
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शरद पवार एका खोलीमध्ये बसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे त्याठिकाणी नमस्कार करताना दिसतायेत. त्यावेळी शरद पवार यांनी त्यावेळी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे तिथून बाहेर निघून गेले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील यावर अनेक वेगेवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
This is how Uddhav Thackeray is being treated by Sharad Pawar.
— Trupti Garg (@garg_trupti) May 3, 2024
He was getting respect from PM Modi and HM Amit Shah which he could not digest. pic.twitter.com/sY7xfifFJa