
Himachal Pradesh । सध्या एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी एक मोठी आणि दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. कुल्लूच्या आनी उपमंडल या ठिकाणी भुस्खलन झालं आणि या भुस्खलनामध्ये अनेक इमारती जमीन दोस्त झाल्या आहेत. दरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास सात इमारती कोसळल्या आहेत. त्याचबरोबर या दुर्घटनेमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे तर अनेक लोक जखमी झाले आहेत.
Government Contractor । सरकारी कंत्राटदार व्हायचंय? जाणून घ्या परवाना प्रक्रिया आणि अर्ज पद्धत
या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आह. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये लोकांचा आक्रोश ऐकायला येत आहे. ओ माय गॉड… ओ यारा… असा आक्रोश या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतोय. काळजाचा ठोका चुकेल असा हा व्हिडिओ समोर आला आहे. (Himachal Pradesh News )
माहितीनुसार, कुल्लू जिल्ह्यातील आनी बस स्टँड जवळ ही दुर्घटना घडली आहे. सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून जवळपास सात इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. इमारती सोबत झाड ही कोसळली आहेत. त्या ठिकाणची परिस्थिती पाहता प्रशासनाने नागरिकांना या इमारती खाली करण्यासाठी एक आठवड्यापूर्वीच नोटीस देखील पाठवली होती मात्र तरी काही नागरिकांनी या इमारतीखाली केल्या नाही आणि आज ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.
Baramti News । मोठी बातमी! बारामती कचरा डेपोला भीषण आग; 80 लाख रुपयांचे नुकसान
कुल्लू के आनी में बैंक के भवन गिरे। इन्हें खाली करवा दिया गया था। #Himachaldisaster#HimachalFloods pic.twitter.com/S9j6cDv3M8
— नवनीत शर्मा-Navneet Sharma (@nsharmajagran) August 24, 2023