Maharastra Rain । शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! पुढील पाच दिवस पाऊस नाही, काय आहे हवामान विभागाचा अंदाज? जाणून घ्या…

News that increases the concern of farmers! No rain for the next five days, what is the weather forecast? Find out…

Maharastra Rain । यंदाच्या वर्षी पावसाने शेतकऱ्यांना चांगलीच वाट पाहायला लावली आहे. राज्यात सात जून रोजी दाखल होणारा मान्सून देखील उशिरा दाखल झाला. जवळपास 25 जूनच्या दरम्यान राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली. यानंतर जुलै महिन्यात झालेल्या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाने चांगलाच ब्रेक घेतला आहे. त्यामुळे शेतकरी राजा आता चिंतेत आहे.

VIDEO : मोठी दुर्घटना! अचानक अनेक इमारती कोसळल्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे; व्हिडिओ पाहून बसेल धक्का

ऑगस्ट महिना संपण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी बाकी आहे. मात्र तरी देखील अजून राज्यात कुठेही मुसळधार पाऊस झाला नाही. श्रावणसरीसारखा रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील तुरळ ठिकाणीच पडत आहे. त्याचबरोबर आता पुढील पाच दिवस पावसाचा कोणताही अलर्ट पुणे हवामान विभागाने दिलेला नाही. पुणे आणि राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे वातावरण नाही असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून वाढ झाली आहे.

Government Contractor । सरकारी कंत्राटदार व्हायचंय? जाणून घ्या परवाना प्रक्रिया आणि अर्ज पद्धत

राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण नसल्यामुळे राज्यभरात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या मोसमी पावसाचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला असून बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे निघून गेले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे.

Chandrayaan-3 Latest Update | चांद्रभूमीवर पोहोचलेल्या लँडर, रोव्हरचं काय? ISRO ने दिली महत्वाची माहिती

राज्यात आतापर्यंत किती पाऊस झाला?

दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी राज्यांमध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 692.70 मीमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यांमध्ये पावसाची नोंद सरासरी 741.10 मीमी आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात पावसाची 7 टक्के तूट आहे. पाऊस कमी झाल्यामुळे राज्यातील धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमी आहे. मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी राज्यातील 22 धरणांमध्ये आतापर्यंत ८६.६५ टक्के पाणीसाठा होता मात्र आता यंदाच्या वर्षी 68.87% पाणीसाठा आहे.

Baramti News । मोठी बातमी! बारामती कचरा डेपोला भीषण आग; 80 लाख रुपयांचे नुकसान

शेतकऱ्यांची पिके जळू लागली

राज्याच्या अनेक भागात ढगाळ स्वरूपाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी कडक ऊन पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची उगवून आलेली पिके आता सुकू लागली आहेत जर पुढच्या पाच-सहा दिवसात चांगला पाऊस आला नाही तर शेतकऱ्याची पिके जळून जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Chandrayaan 3 । देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा! भारत बनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश

पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार?

अनेक शहरांना धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे आगामी काळात जर पाऊस आला नाही तर शहरी भागातील लोकांना देखील पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. तसेच लवकरात लवकर मुसळधार पाऊस व्हावा अशी आशा देखील नागरिकांना लागली आहे.

Spread the love