फ्री मध्ये करा घरबसल्या आधार कार्ड अपडेट, १५ जून पर्यंत शेवटची संधी

Update Aadhaar card at home for free, last chance till June 15

आधार कार्ड ( Aadhar Card ) मध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी आधार कार्ड अपडेट करावे लागते. परंतु हे आधार कार्ड 15 जून पर्यंतच घरबसल्या अपडेट केले जाईल. त्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दर आकारले जातील. याविषयी UIDAI माहिती दिली आहे.

शरद पवार यांना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता पक्ष सोडणार

आधार कार्ड ऑफलाईन अपडेट करण्यासाठी महाई-सेवा केंद्रामध्ये ( Maha E Seva Kendra ) पन्नास रुपये शुल्क आकारला जातो. 15 जूनपूर्वी आधार कार्ड अपडेट करणाऱ्या नागरिकांकडून पैसे वसूल केले जाणार नाही. UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन त्यावर तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा. आधार कार्ड मधील जे दुरुस्ती करायची असेल त्यावर क्लिक करून अचूक माहिती भरा. माहितीची पडताळणी करण्यासाठी पॅन कार्ड ( PAN card ) , मतदान कार्ड ( Voting card ) अशा साहय्यक कागदपत्राची जोडणी करा. त्यानंतर सर्व माहिती ऑनलाईन अपडेट होईल.

भयानक! तब्ब्ल ६ वर्षांपासून आईच्या मृतदेहासोबत राहत होता, धक्कादायक कारणही आलं समोर

आवश्यक तेथे माहिती इंग्रजी किंवा मराठी भाषेमध्ये भरावी. आधार कार्ड दुरुस्त करत असताना URN सुरक्षित आहे का याची खात्री करून घ्यावी. जर आधार कार्ड धारकाकडे मोबाईल नंबर नसेल तर, आधार कार्ड दुरुस्ती करण्यासाठी ऑफलाइन पर्यायाचा वापर करा.

एका युजरला Sorry म्हणतं ChatGPT ठरली अपयशी, युजरने स्क्रीनशॉट केला व्हायरल!

काही व्यक्तींना लग्नानंतर नावामध्ये दुरुस्ती करावी लागते. परंतु त्यासाठी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट देखील लागतात. पासपोर्ट, पॅन कार्ड, रेशन कार्ड, वोटर आईडी या महत्वपूर्ण डॉक्युमेंटचा आधार कार्ड अपडेटसाठी समावेश असावा. आधारची फोटोकॉपी शेअर करताना सतर्क राहून काळजी घेणं देखील गरजेच आहे.

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा14 वा हप्ता

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *