Uddhav Thackeray । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मैदानात उतरून नव्याने पक्ष उभारणीला सुरुवात केली आहे. मात्र मागच्या काही दिवसापासून अनेक जण ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाला लागलेली ही गळती अजूनही कायमच आहे.
सध्या देखील सोलापूर (Solapur) या ठिकाणचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर साईनाथ अभंगराव हे शिंदे गटात (Shinde group) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
Bus Fire । धक्कादायक बातमी! धावत्या शिवशाही बसला भीषण आग; संपूर्ण बस जळून खाक
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी आता सोलापूर जिल्ह्यातील शरद कोळी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर सोलापूर या भागातील जुन्या व निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये धुसफूस वाढली आणि यामधूनच अभंगराव यांनी शरद कोळीच्या निवडीवर आक्षेप घेत राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.