Supriya Sule । भाजप म्हणजे काखेत कळसा अन् गावाला वळसा…; कंत्राटी भरतीवरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

Supriya Sule

Supriya Sule । कंत्राटी भरतीवरून राज्याचं राजकारण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आणि तसेच कंत्राटी भरतीवरून मविआ सरकारवर सडकून टीका केली. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे.

पाहा सुप्रिया सुळे यांचे ट्विट जशेच्या तशे – (Supriya Sule Tweet )

भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. माफीनामा…! माफीनामा…!! असे ओरडत भाजपने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे. कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती. कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपाने जरुर घ्यावा. राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

त्याचबरोबर म्हणाल्या की, उप-उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पुर्वसूरींवर फोडायची खोड आहे . उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे ‘हवाबाण’ सोडण्याची हिंमत केली नसती. कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ व २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही.

भाजपाच्या नेत्यांना संदर्भ आठवत नसतील तर पुढील यादीतील नेत्यांना संपर्क साधावा.

  1. विजयकुमार गावीत,
  2. राधाकृष्ण विखे पाटील,
  3. अजित पवार,
  4. नारायण राणे,
  5. दिलीप वळसे पाटील,
    6.छगन भुजबळ,
  6. सुनील तटकरे,
  7. हसन मुश्रीफ

महाविकास आघाडीच्या शासनकाळातील मंत्री ..

  1. एकनाथ शिंदे
  2. अजित पवार,
  3. दिलीप वळसे पाटील,
  4. छगन भुजबळ,
  5. उदय सामंत,
  6. धनंजय मुंडे,
  7. शंभूराज देसाई,
  8. गुलाबराव पाटील,
  9. दादा भुसे,
  10. संजय राठोड,
  11. संदीपान भुमरे,
    12 अब्दुल सत्तार,
  12. संजय बनसोडे,
  13. आदिती तटकरे
Spread the love