एसटीचा प्रवास करणं बेतलं जीवावर, प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एकाचा मृत्यू

Bus

एसटीच्या (Bus) चाकाखाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना कंधार (Kandahar) तालुक्यातील शेल्लाळी फाट्यावर घडली आहे. रस्ता खराब असल्याने हा अपघात झाला त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लक्ष्मण शेषराव गायकवाड (वय ४०)असे या मृत प्रवाशाचे नाव आहे. त्यांना पत्नी, चार मुली, चार बहिणी, दोन भाऊ आणि आई असा परिवार आहे. (Latest Marathi News)

सर्वात मोठी बातमी! उदयनराजे भोसले यांनी उधळून लावलं शिवेंद्रराजेंच्या हस्ते होणारं भूमिपूजन; पुन्हा एकदा मोठा वाद उफाळून येणार?

याबाबतची अधिक माहिती अशी की, बऱ्याच दिवसापासून आंबुलागा ते सावरगावपर्यंत रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. गायकवाड हे एसटीने प्रवास करत होते. आंबुलागा येथून दोन किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या शेल्लारी फाट्याजवळ हा अपघात झाला असून बस कंधारहून मुखेडकडे जात होती. गायकवाड हे एसटीच्या दारात उभे होते. एसटी खड्ड्यात जोरात आदळल्याने गायकवाड एसटीतून बाहेर फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मोठा मार बसला.

Salman Khan । ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे सलमान खानवर गंभीर आरोप; म्हणाली, “मला कुत्र्यासारखं…”

गायकवाड हे वीट कामगार आहेत. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कुटुंबीय हवालदिल झाले आहे. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

देशाच्या पंतप्रधानांचे नाव सांगायला आले नाही म्हणून मोडले लग्न; बंदुकीचा धाक दाखवत नवरीने थाटला लहान भावाशी संसार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *