शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे अन् आपल्याला आमदार पद मिळावे म्हणून, शेतकरी पुत्राने केली विठ्ठल चरणी वीट अर्पण

To bring good days to the farmers and to get MLA post, the farmer's son offered a brick at Vitthal's feet

महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकऱ्यांवर येणारे अस्मानी संकटे असो की शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसानंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बीडच्या एका शेतकरी पुत्राने विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना केली आहे.

अजित पवारांची ‘ती’ भीती खरी ठरणार का? राजकारणात नवीन ट्विस्ट

बीड जिल्ह्यातील दहिफळ वडमाऊली येथील किसान पुत्र श्रीकांत विष्णू गदळे हे पंढरपूरच्या श्री विठ्ठल चरणी वीट अर्पण करणार आहेत . किसान पुत्र श्रीकांत विष्णू गदळे हे गेल्या दहा-बारा वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर निस्वार्थपणे सातत्याने काम करत आहे मात्र काम करत असताना त्यांच्याकडे कसलेही पद नसल्यामुळे त्यांना अनेक वेळा शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यचे प्रश्न सोडवण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे.

Driving license । ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यास टेन्शन नका घेऊ, घरबसल्या असे मिळवा डुप्लिकेट लायसन्स; जाणून घ्या प्रक्रिया

या सर्व गोष्टीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठलाने लक्ष घालून बळीराजाचे चांगले दिवस आणावेत व सर्व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला सदबुद्धी देऊन आपल्याला आमदारकी मिळावी यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाला चंदनाची व सागवाना पासून तयार केलेली वीट अर्पण करणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत माहिती स्वतः श्रीकांत गदळे यांनी दिली आहे.

आनंदाची बातमी! मुंबईसह राज्यातील ‘या’ भागात पडला मुसळधार पाऊस

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *