Political News । प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Threatened to kill Prasad Lad, Chief Minister took a big decision

Political News । मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासुन राजकीय घडामोडी घडत आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येत आहेत. लवकरच राज्यात लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. त्यासाठी सर्व पक्षांकडून आतापासूनच तयारी केली जात आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशातच आता भाजपच्या (BJP) बड्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. (Latest Marathi News)

Neeraj Chopra । नीरज चोप्राने मिळवला वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप अंतिम फेरीत प्रवेश, पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीटही झालं कन्फर्म

भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. एका अनोळखी व्यक्तीकडून आपल्यावर पळत ठेवली जात असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी पत्रात केला आहे. गायकवाड नाव असणारी व्यक्ती विविध मार्गाने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे, असे पत्रात प्रसाद लाड यांनी नमूद केले आहे.

Agriculture News | कोथिंबीरीला भाव नसल्याने शेतकऱ्यानं एक एकर कोथिंबिरीवर फिरवला रोटर

दरम्यान, प्रसाद लाड यांनी सोशल मीडियावरही (Social media) याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणाची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. शिंदे यांनी फोनवर प्रसाद लाड यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणानंतर प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत वाढ होऊ शकते.

Onion Rate । शेतकऱ्यांना मोठा फटका! निर्यात शुल्क वाढीनंतर कांद्याच्या दरात कमालीची घसरण

Spread the love