
Mushroom Price । गोंदिया : तुमच्यापैकी असे काही लोक असतील जे महिन्यातून किमान एकदा तरी घरचे जेवण सोडून हॉटेलमध्ये (Hotel) चटपटीत पदार्थ खाण्यासाठी जात असतील. हॉटेलमध्ये फक्त एक नाही तर वेगवेगळे पदार्थ असतात. अनेकजण तर चिकन आणि मटणावर चांगलाच ताव मारतात. परंतु, अशी एक भाजी आहे जी मटणापेक्षा (Mutton) खूप महाग आहे आणि सध्या या भाजीचीच चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)
Dragon Fruit Farming । शेतकरी बांधवांनो, ड्रॅगन फ्रुट लागवड करून मिळवा सरकारी अनुदान
अनेकांना आरोग्यासाठी पोषक असणारी मशरूमची भाजी (Mushroom vegetable) आवडते. आता याच खवय्यांना निराश करणारी एक बातमी आहे, त्यांच्या आवडीची मशरूमची (Mushroom) भाजी खाण्यासाठी जास्त पैसे (Mushroom Rate) मोजावे लागणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात मटणापेक्षाही दुप्पट किमतीने जंगली मशरूमची विक्री केली जात आहे. एक किलो मशरूमची किंमत एकूण 1200 रुपये इतकी आहे.
गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यामधील जंगलामध्ये मशरूम मोठ्या प्रमाणात आढळते. अनेकजण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करत नाहीत. त्यामुळे या भाजीला चांगली मागणी आहे. परंतु, जंगली मशरूमला जास्त दर मिळत असल्याने सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे. किंमत जास्त असल्याने मशरूम उत्पादक शेतकऱ्यांची चांदी होत आहे.
Ola S1 X । ओलाने लॉन्च केल्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, 151 किमी रेंज आणि शानदार फीचर्ससह किंमत आहे..