
Ekanth Shinde । मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (Shivsena) पक्षात मोठी फूट पाडून भाजपासोबत (BJP) सत्तेत सहभागी झाल्यापासून त्यांना अजूनही विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच त्यांनी रोटरी क्लबच्या कार्यक्रमामध्ये बोलताना असताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. “गेल्या वर्षभरापासून विरोधकांकडून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय”, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. (Latest Marathi News)
Ola S1 X । ओलाने लॉन्च केल्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, 151 किमी रेंज आणि शानदार फीचर्ससह किंमत आहे..
“विश्वनाथ आनंद (Vishwanath Anand) यांनी खरंतर राजकारणात यायला पाहिजे होते. कारण राजकारणामध्ये सुद्धा एकाच वेळी कित्येक विरोधकांचा सामना करावा लागतो. त्यातील काही विरोधक हे तिरक्या चालीचे उंट असतात. तर काही अडीच घरे चालणारे घोडे आणि काही हत्ती असतात. बुद्धिबळ खेळण्याची परंपरा आपल्या राज्यात आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत सात ग्रँडमास्टर झाले, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
“मलाही मागील एक वर्षापासून अनेक जण चेकमेट करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अजूनही त्यांचं स्वप्न साकार होत नाही. त्यांनी त्यांची बुद्धी कितीही पणाला लावली असली तरी जनतेचा पाठिंबा माझ्यासोबत असल्याने ते सतत चितपट होत आहेत. कारण आम्ही राजकारणातील बुद्धिबळाचे ग्रँडमास्टर आहोत, असा दावा शिंदे यांनी केला आहे.
Jayakwadi Dam Water Storage । मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट, जायकवाडी धरणात फक्त 34 टक्के पाणीसाठा
हे ही पहा