प्रत्येक आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड (PAN card) खूप महत्त्वाचे आहे. फक्त आर्थिक नाही तर ते शासकीय तसेच खाजगी कामातही खूप महत्त्वाचे असते. पॅनकार्डशिवाय अनेक कामे रखडली जातात. जर तुमच्याकडे पॅनकार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. आयकर विभागाने यापूर्वीही पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक (PAN Adhar Link) करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Latest Marathi News)
पहाटेच्या शपथविधीबद्दल माहित होतं का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” तेव्हा मला… “
तरीही त्याकडे अनेकांनी लक्ष दिले नाही. 30 जून 2023 ही आधार कार्ड (Adhar Card) पॅनशी लिंक करण्याची अंतिम मुदत (PAN Aadhar Link Last Date) होती. परंतु याबाबत आयकर विभागाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे पॅन-आधार लिंक करण्यासाठी पॅनकार्डधारकांना आणखी काही दिवसांचा कालावधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्वरा करा! वनप्लसच्या ‘या’ 5G फोनवर होईल 24 हजारांपेक्षा जास्त बचत, असा करा ऑर्डर
आयकर विभागाने (Income Tax Department) याबाबत एक ट्विट केले आहे की, “ज्या प्रकरणांमध्ये पॅन कार्डधारकाने पेमेंट करून संमती दिली आहे, मात्र 30 जून 2023 पर्यंत लिंक केलेले नाही, त्यांच्या प्रकरणांचा विभागाकडून विचार करून दिलासा देण्यात येऊ शकतो. लिंक करण्यासाठी आता चलन पावती डाउनलोड करण्याची गरज नसून पॅन धारकाने यशस्वी पेमेंट पूर्ण केल्यास त्यांना चालानच्या प्रतीसह एक ईमेल पाठविला जाईल.
हे ही पहा